फलटण. फलटण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजपाच्या वतीने नगरसेवक पदासाठी कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी आपली उमेदवारी दाखल करून वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून विजय प्राप्त केला.
आणि सर्वात लहान वयाच्या नगरसेवक लोकप्रतिनिधि म्हणून मोठी जबाबदारी प्राप्त करून आपल्या राजकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्राचा वारसा जतन करण्यास सुरुवात केली.
सिद्धाली शहा यांचा हा विक्रम म्हणजे अलीकडच्या काळात राजकारणात तरुणाईचा वाढता सहभाग पाहता एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे.
राजकीय क्षेत्रातील पाठबळावर सामाजिक शैक्षणिक व समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या क्षेत्रात समाजाच्या जडणघडण आणि विकासात भिमुख भूमिकेतून एक तरुण नेतृत्व म्हणून लोकसेवेत सहभाग नोंदवताना वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना मिळालेला हा बहुमान नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्ने जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून कुमारी सिद्धाली शहा यांच्या नावाची अधिकृत नोंद केली असून याबाबतचे प्रमाणपत्र ही त्यांना प्रदान करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील फलटण या शहराच्या बाबत ही निश्चितच मोठी अभिमानाची बाब असून त्यांचा सामाजिक शैक्षणिक आणि महिलांसाठी असणाऱ्या क्षेत्रात काम करण्याचा संकल्प पाहता पुढील भविष्यकाळात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विकासाची दिशा निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली आहे.
कुमारी सिद्धाली शहा यांचे पिता श्री अनुप शहा (डॅडी) हे पण फलटण नगरपरिषद येथे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्याच्या विचारांचा वारसा त्यांची लेक पुढे नक्कीच घेऊन जाईल असे त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून तर दिसून येत आहे.
कुमारी सिद्धाली शहा यांच्या यशाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ऍडव्होकेट सौ जिजामाता नाईक निंबाळकर नगराध्यक्ष श्री समशेर सिंह नाईक निंबाळकर सर्व नगरसेवक व फलटण शहरातील सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.