राज महाराष्ट्र टाईम्स
search

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
“

भोंदूगिरीचे घटनेचे गांभीर्य ओळखून फलटण शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात संशयित सौरभ मध्ये यास केली अटक. 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी. येत्या अमावस्येपर्यंत कुटुंब संपवण्याची संशयित आरोपीने दिली होती कधीच धमकी.

💥राज महाराष्ट्र टाइम्स💥💥

फलटण, फलटण शहरात भोंदूगिरी करून शेजारीच राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना अंगात भूत आहे ते भूत बाहेर काढतो असे सांगून व वेगवेगळे बनाव करून अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणारा संशयित आरोपी सौरभ मदने यास अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या 24 तासात फलटण पोलिसांनी सात आक्टोबर 2026 रोजी आरोपीस अटक केली आहे.

मेहरबान कोर्ट समोर आरोपीस उभे केले असता दिनांक 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत कोर्टाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.

या संशयीत आरोपीच्या वारंवार त्रासाला आणि अत्याचाराला कंटाळून या शाळकरी मुलीने दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी घरातून पहाटे सकाळीच कोणालाही न सांगता बदनामी होईल या भीतीपोटी मानसिक तणावाखाली घरातून निघून वाई येथे गेली होती. वाई येथील पोलीस स्टेशनमध्ये सदर अल्पवयीन मुलगी आढळून आल्यानंतर या अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली.

वरील घटना समजल्यानंतर फलटण शहरात एकच खळबळ उडाली आणि फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संतप्त कुटुंबीय आणि जमावा च्या वतीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने फलटण शहर पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे तसेच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांनी फलटण शहर चे पोलीस स्टेशनचे चाणाक्ष आणि कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन शिंदे यांच्यासोबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथील हुशार आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, संभाजी जगताप, यांनी मिळालेल्या माहितीनुसार अतिशय सुसूत्र पद्धतीने संशयित आरोपी सौरभ मदने यास विमानतळाच्या परिसरात मोठ्या शितापीने आणि धाडसाने अटक करून ताब्यात घेतले.

फलटण शहर पोलीस स्टेशनच्या या अत्यंत तातडीच्या कारवाईने फलटण शहरातील नागरिकांनी आणि पीडितअल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या घटना आता सातत्याने फलटण तालुक्यात दिसून येत असून लोकांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन खोटे बनाव करून अंधश्रद्धेला खतपाणी घालून आपली पोळी भाजून घेणाऱ्या अशा भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूंना कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.


🏵️अंधश्रद्धे विरोधात प्रबोधनाची गरज.🏵️

हल्लीच्या काळात दिवसेंदिवस वाढत असणारा वेगवेगळ्या कारणामुळे मानसिक तणाव आणि या तणावापोटी अशा भोंदूगिरी करून लोकांच्या असाही त्याचा फायदा घेऊन लोकांना वेगवेगळ्या प्रसंगांना नाहक बळी पडावे लागत आहे याबाबत आता अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधनाची गरज दिसून येत आहे.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)
सामाजिक

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)

ANCHOR AD SLOT