राज महाराष्ट्र टाईम्स
search

फलटण शहर पोलीस यांच्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

फलटण शहर पोलीस यांच्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम
“

23 सप्टेंबर 2026 रोजी सर्वसामान्य नागरिक जेष्ठ नागरिक विद्यार्थी यांना सायबर फसवणुकीबाबत फलटण पोलिसांच्या कडून प्रबोधन आणि माहिती.

फलटण शहर पोलीस स्टेशन च्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम..

राज महाराष्ट्र टाइम्स

फलटण : वर्तमान काळात डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. अशा प्रकारच्या डिजिटल सुविधांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारही वाढत आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्या साठी आणि नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद फोन, संदेश, लिंक किंवा ऑनलाइन व्यवहाराला बळी न पडता सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन फलटण पोलिसांच्या वतीने उपस्थित सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना करण्यात आले आहे.



सायबर फसवणुकीमध्ये नागरिकांकडून OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. बँक, पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था फोनवरून OTP, PIN किंवा पासवर्ड मागत नाही. त्यामुळे अशी माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. याबाबत माहिती देण्यात आली


UPI व्यवहार करतानाही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नसते. पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी QR कोड स्कॅन करण्यास सांगत असल्यास सावध राहावे. UPI PIN हा प्रामुख्याने पैसे पाठवताना वापरला जातो, त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणताही व्यवहार करू नये याबाबतची सतर्कता बाळगण्याचे ही आवाहन करण्यात आले.



KYC अपडेट, बँक खाते बंद होणे, वीज बिल थकीत असणे, पार्सल अडकल्याचे संदेश किंवा इतर वेगवेगळी आमिष दाखवून पाठवण्यात आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही वेबसाइटवर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरण्यापूर्वी वेबसाइटचा पत्ता काळजीपूर्वक तपासावा.


सोशल मीडियाच्या वापरातही सावधगिरी आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींच्या Friend Request स्वीकारताना विचार करावा. हळदी अनोखी व्यक्तींकडून सोशल मीडियावर फ्रेंड्स बनवून नाही त्रास दिला जात असल्याच्या घटना घडत आहे. वैयक्तिक फोटो, मोबाईल क्रमांक, घराचा पत्ता, ओळखपत्रे किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींना पाठवू नये. बनावट Instagram किंवा Facebook अकाउंट आढळल्यास त्याची तातडीने तक्रार करावी.


‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने फसवणूक.


पोलीस, CBI, ED किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवणे आणि त्यानंतर पैशांची मागणी करणे, हा सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार आहे. अशा वेळी घाबरून पैसे देऊ नयेत. पोलीस किंवा इतर कायदा अंमलबजावणी संस्था फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैसे घेत नाहीत.


ज्येष्ठ नागरिकांनी बँक खाते, ATM, UPI, OTP आणि इतर आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये. संशयास्पद फोन आल्यास घरातील विश्वासू व्यक्ती किंवा पोलीसांशी तात्काळसंपर्क साधावा.


विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन संवाद करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींशी चॅट करताना स्वतःचे फोटो, शाळेची माहिती, घराचा पत्ता किंवा अन्य वैयक्तिक माहिती शेअर करू नये. ऑनलाइन त्रासदायक किंवा संशयास्पद संपर्क झाल्यास पालकांना तातडीने माहिती द्यावी.


🚨फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा.🚨

सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न घालवता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तातडीने संपर्क करावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी आणि जवळच्या पोलीस ठाण्यातही माहिती द्यावी. फसवणुकीनंतर जितक्या लवकर तक्रार केली जाते, तितक्या लवकर संबंधित यंत्रणांना व्यवहारावर आवश्यक कारवाई करण्याची संधी मिळते.


सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर बंद करण्याची गरज नाही; मात्र त्याचा वापर करताना जागरूकता आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ‘थांबा विचार करा मगच क्लिक करा’ हा मंत्र डिजिटल व्यवहार करताना प्रत्येकाने लक्षात ठेवावा. अशा प्रकारचा अत्यावश्यक सूचना आणि माहिती देण्यात आली.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)
सामाजिक

फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान)

ANCHOR AD SLOT