फलटण. फलटण शहरात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी आणि फलटण शहरातील व्यापारी व नागरिक यांच्या समस्या निवारण करण्यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे श्री घनश्याम बल्लाळ पोलीस निरीक्षक फलटण शहर यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत 25 ऑगस्ट 2026 रोजी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत फलटण शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी उपस्थित राहून पोलीस प्रशासनासमोर फलटण शहरात व्यापारी आणि नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याबाबत कल्पना देऊन पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती पण व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांनी व्यापाऱ्यांना भुरट्या चोऱ्या तसेच उपद्रवी लोकांच्या पासून होत असणाऱ्या त्रासाबाबत तात्काळ फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्यास सांगून इथून पुढे दररोज शहरातील प्रमुख चौक वरदळीची ठिकाणे बाजारपेठ येथे पोलीस प्रशासन आपली उपस्थिती दर्शवून कोणत्याही प्रकारची गैरकृत्य न घडण्यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे अशी माहिती दिली.
या स्तुत्य उपक्रमाचे फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी स्वागत करून फलटण शहराची धार्मिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शहर म्हणून असणारी ओळख अशीच कायम वृद्धिंगत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यदक्षतेने नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्य करून शहरांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था राबविण्यात यावी. अशी विनंती केली.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनच्या सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मचारी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन 24 तास पोलीस प्रशासन आपणास मदतीसाठी असेल असे प्रतिपादन पण पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांनी केले.
याबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने फलटण शहरातील सिटीबजार उद्योग समूहाचे नामांकित व्यापारी डॉक्टर सूर्यकांत दोशी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
या सुसंवाद बैठकीत फलटण शहरातील व्यापारी श्री मंगेश जोशी रविवार पेठ येथील व्यापारी मित्र म्हणून ओळखले जाणारे दिगंबर कुमठेकर व बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.