गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी फलटणची अल्पावधीत आर्थिक प्रगती.
राज महाराष्ट्र टाइम्स.
फलटण. सहकार क्षेत्रात सक्षम नेतृत्व क्रियाशील संचालक मंडळ आणि कष्टाळू व मेहनती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने फलटण येथील गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची आर्थिक प्रगती चा वाढता आलेख यशस्वीरित्या चालू असून या संस्थेने सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा जाहीर केले आहे. या संस्थेला सातत्याने ऑडिटचा अ वर्ग मिळाल्याची माहिती संस्थेचे क्रियाशील संस्थापक चेअरमन सचिन यादव यांनी दिली आहे.
💥 गॅलेक्सी प्लस सोसायटीच्या एकूण नऊ शाखा आणि 70 कोटी रुपयांच्या ठेवी💥.
गॅलेक्सी प्लस च्या सर्वांच्या समन्वयाने आणि सहकार्याने तसेच नागरिकांच्या विश्वासास अल्पावधीतच पात्र झालेल्या या संस्थेचा व्यवसाय 125 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नऊ शाखांच्या माध्यमातून 70 कोटी रुपयांच्या ठेवी आणि सभासदांचा आर्थिक गरजेपोटी एकूण 55 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेने सभासदांच्या हिताचा विचार करता सभासदांना तात्काळ सुलभ सेवा देण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विनम्र सेवा हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे मोबाईल बँकिंग गोल्ड टेस्टिंग मशीन डिजिटल पिग्मी यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून त्याचा थेट लाभ ग्राहकांना देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शक संस्थापक सचिन यादव हे आपल्या व्यावसायिक कौशल्याने करत असताना दिसून येत आहेत.
गॅलेक्सी प्लस या संस्थेचा आता पुणे जिल्ह्यात सुद्धा वाढता विस्तार सुरू असून आंबेगाव पुणे येथेही नवीन शाखा कार्यरत झाली असून भविष्यात संस्थेचे कार्यक्षेत्र अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेईल अशी आशा आणि संचालक मंडळाचे प्रयत्न चालू आहेत. सभासदांच्या विश्वासाने संस्थेच्या ठेवी दिवसेंदिवस वाढत असून संस्थेत सभासद ग्राहक यांच्याकडून मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाने आणि व्यवस्थापनाच्या कौशल्याने गॅलेक्सी प्लस क्रेडिट सोसायटी महाराष्ट्र आणि कर्नाटक लवकरच ग्राहकांच्या विश्वासास आणखी पात्र ठरणार आहे अशी माहिती संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली