राज महाराष्ट्र टाईम्स
search

कै. जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) संस्थापक सदस्य लायन्स क्लब ऑफ फलटण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकसभा

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कै. जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) संस्थापक सदस्य लायन्स क्लब ऑफ फलटण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकसभा
“

कै.जगजीवन हिरजी गरवालीया मिस्त्री, यांच्या स्मृती प्रित्यर्थ तीन ऑक्टोबर 2026 रोजी महाजन मंदिर सभा मंडप येथे शोकसभा.

लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य कै. जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३ ऑक्टोबर रोजी शोकसभेचे आयोजन केले आहे.


फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि फलटणमधील सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे कै.जगजीवन हिरजी गरवालीया उर्फ मिस्त्री यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांनी केलेल्या बहुमूल्य कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता माळजाई मंदिर सभा मंडप, फलटण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.


कै.जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक जीवनात फलटण शहराच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी सामाजिक सेवेचा भक्कम पाया घातला. लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवेचे विविध उपक्रम राबविताना त्यांनी लायन्स मुधोजी आय चॅरिटेबल हॉस्पिटलच्या उभारणीत मोठा वाटा होता व डोळ्याच्या विकारावर होणारा उपचार सामान्य लोकांना मोफत व सुलभ होईल याची दूरदृष्टी त्यांनी पाहिली तसेंच फलटण मधील अनेक संस्थांच्या उभारणीत,जडणघडणीत आणि विकासात मोलाची भूमिका बजावली.


अंबाई-माळजाई मंदिर देवस्थान ट्रस्ट, मुधोजी लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल, उघडा मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांसह फलटणमधील विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि संस्थांच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.


समाजातील सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत सामाजिक कार्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले कार्य फलटणकरांच्या मनात कायम जिवंत राहील.


कै. मिस्त्री यांच्या कार्याला अभिवादन आणि त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित या शोकसभेस फलटणमधील सर्व क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे तमाम फलटणकर उपस्थित राहणार आहेत.


या शोकसभेचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ फलटण परिवारातील सर्व सदस्य तसेच क्लबच्या सहयोगी संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपापली जबाबदारी स्वीकारून सहकार्य करावे. सर्वांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या शोकसभेला उपस्थित राहावे आणि कै. जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने करण्यात येत आहे.


शोकसभेचा तपशील


- दिनांक : शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६

- वेळ : सायंकाळी ठीक ४ वाजता

- स्थळ : माळजाई मंदिर सभा मंडप, फलटण

- आयोजक : लायन्स क्लब ऑफ फलटण.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

ANCHOR AD SLOT