💥 राज महाराष्ट्र टाइम्स,💥
फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने कै.लायन जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या स्मृती जतन करत, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी शोकसभा घेण्यामागील प्रमुख उद्देश लायन्स क्लब ऑफ फलटणचा आहे.
कै. लायन जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांनी फलटण शहराच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य व आंबाई -माळजाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कै. लायन जगजीवन हिरजी गरवालीया मिस्त्री यांनी माळजाई देवी परिसराच्या विकासामध्ये त्यांचे अनमोल योगदान आणि समाजासाठी निस्वार्थ कार्य करण्याची त्यांची भावना ही अनेकांसाठी प्रेरणादायी राहिलेली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा भविष्यात पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
श्री माळजाई देवी मंदिर व परिसर विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान व अथक परिश्रम, जिद्द, संघर्ष व चिकाटी यामुळे लायन्स क्लब ऑफ फलटणच्या पुढील पिढीला आणि तमाम फलटणकर यांना एक आदर्श आणि प्रेरणा मिळणार आहे. सामाजिक हितासाठी लावलेले वृक्ष भविष्यात अनेकांना सावली देते, त्याचप्रमाणे समाजासाठी केलेले कार्य अनेक पिढ्यांना दिशा देत असते, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी आपले निस्वार्थ कार्य केले. कै. गरवालिया मिस्त्री यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा लायन्स क्लब ऑफ फलटणचा प्रयत्न आहे.
— लायन्स क्लब ऑफ फलटण.
अध्यक्ष -श्री.रणजीत बर्गे,
सचिव- श्री.प्रमोद
निंबाळकर,
खजिनदार- श्री.दिलीप शिंदे.