शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटण, अध्यक्ष पदाचा श्री राजेश हेंद्रे यांचा चौकार.
🏵️राज महाराष्ट्र टाइम्स🏵️
फलटण. फलटण शहरात रविवार पेठ येथे असणाऱ्या शिंपी समाज याच्या विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीची निवड होऊन सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी श्री. राजेश हेंद्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
तर उपाध्यक्षपदी श्री मिलिंद गाटे, व सचिवपदी श्री. राजेंद्र कुमठेकर यांची निवड झाली.
फलटण येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सर्व निवडी झाल्या. विशेष म्हणजे समाजात असणारा एकोपा सर्व निवडी बिनविरोध करून प्रामुख्याने दिसून आला.
तर सदस्य पदी डॉक्टर राजेंद्र हेंद्रे, राजेंद्र गाटे, देवेंद्र हेंद्रे ,विशाल काकडे, कौस्तुभ टाळकुटे ,मंगेश पोरे, सोहम गानबोटे, यांची निवड झाली. ट्रस्टच्या सल्लागार समितीत संजय जामदार, अविनाश कुमठेकर, श्रीपाद टाळकुटे, संजय हेंद्रे ,प्रकाश गाटे, महेश उरणे, बाळासाहेब पतंगे, चंद्र सेन कुमठेकर, रेखा हेंद्रे ,अंजली कुमठेकर, अश्विनी हेंद्रे, यांची निवड करण्यात आली.
या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिंपी समाजातील बंधू-भगिनींच्या वतीने अभिनंदन करून ट्रस्टच्या धार्मिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल मंदिर महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभा मोहटकर, श्री संत नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे यांची उपस्थिती होती.
दरवर्षी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे विठ्ठल मंदिर येथे आयोजन करण्यात येत असते तसेच श्री. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा परतीचा पालखी सोहळा आळंदीच्या दिशेकडे प्रस्थान होताना एक दिवस विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी असतो यावेळी ट्रस्टच्या वतीने माऊलीच्या मुक्कामी सोहळ्याचे अत्यावश्यक असे योग्य व शिस्तबद्ध नियोजन केले जाते.