राज महाराष्ट्र टाइम्स.
फलटण (वाखरी).
ब्रिटिश काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची पहिली मशाल पेटवणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती वाखरी तालुका फलटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
वाखरी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात वाखरी गावातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ग्रामस्थ एकत्र येऊन आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी पुढील पिढीला त्यांच्या विचारांची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी वाखरी येथे जयंती उत्साह साजरी करण्यात येत असते याच अनुषंगाने यावर्षीही वाखरी गावचे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे माजी चेअरमन पैलवान दादा पाटील, माजी सरपंच श्री प्रवीण गायकवाड, माजी उपसरपंच श्री अक्षय जाधव, जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री संभाजी ढेकळे पाटील, युवा नेते पैलवान सौरभ ढेकळे पाटील, श्री गणपत जाधव व मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी आद्य क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी जतन करण्याचा संकल्प केला.